Indian Constitution and Polity | Electoral System | Manjunatha B | Sadhana Academy | Shikaripura
Hindu Dhar and Hindutva
Sadhana Path (Marathi)
Sadhana Path by Osho
व्यक्ती हेच समष्टीचे एकक आहे. त्यातूनच विकास व क्रांती होणार आहे. ते एकक तुम्ही आहात. त्यामुळेच मी तुम्हाला साद घालू इच्छितोय. मला तुम्हाला निद्रेतून जागवायचं आहे.
तुम्हाला दिसतंय का की, तुमचं जीवन कंटाळवाणं, निरर्थक आणि उबग आणणारं झालंय?
आयुष्याचा अर्थ आणि आशय हरवलाय. हे स्वाभाविकच आहे. मनुष्याच्या आत प्रकाश नसेल तर त्याच्या जीवनात अर्थ असू शकत नाही. मनुष्याच्या अंत:करणात ज्योत तेवत नसेल, तर जीवनात आनंद असू शकत नाही.
वस्तुत : माणसाच्या आत काहीही विझत नाही... आणि मनुष्य दिशाहीनही होत नाही. अंतर्नेत्र बंद असेल तर अंधार पसरतो आणि दिशांचा ठावठिकाणा लागत नाही. डोळे बंद असतील तर तो कमनशिबी आहे आणि डोळे उघडताच तो सम्राट होतो. मी तुम्हास कमनशिबी असण्याच्यास्वप्नातून सम्राट होण्याच्या जागृतीसाठी बोलावत आहे. मला तुमचा पराभव विजयामध्ये परिवर्तित करायचा आहे, आणि तुमच्या अंधाराला प्रकाशामध्ये आणि तुमच्या मृत्यूला अमृतामध्ये... परंतु तुम्ही माझ्यासोबत या प्रवासाला निघण्यासाठी उत्सुक आहात का?
- प्रस्तुत पुस्तकातून
-----------------------------------------------------------------------------------
'साधना पथ' या पुस्तकात ओशोंच्या चौदा प्रवचनांचे संकलन केले आहे. त्यामध्ये केवळ 'स्व' ध्यानाचे नाही, तर समाज आणि धर्माच्या ध्यानाचेही महत्त्व विशद केले आहे.
ध्यानसाधनेतून स्वत्वाची जाणीव उत्पन्न व्हावी म्हणून ओशोंनी अनेक उदाहरणे दिली आहेत. केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर सामान्य जीवन जगणाऱ्यांच्या दृष्टिकोनातूनही यामध्ये चर्चा केली गेली आहे, शिवाय ओशोंनी निरसन केलेल्या शंका आपल्याला प्रश्नोत्तराच्या स्वरूपात पहायला मिळतील. स्वत्वाची जाणीव निर्माण होण्याबाबत ओशो म्हणतात, “साधना एकटेपणात एकाकीपणात जन्माला येत असते. पण मानव तर कधीच एकटा नसतो. तो नेहमीच गर्दीने वेढलेला असतो आणि बाहेर गर्दी नसेल तर अंतर्मनात विचारांची गर्दी असते. या गर्दीचे विसर्जन करायचे आहे. तुमच्या अंतर्मनात गर्दी होऊ देऊ नका आणि बाहेरही या शिबिरात आपण एकटेच आहोत असं जगायचं आहे. इतरांशी कसलाही संबंध ठेवायचा नाही.
संबंध ठेवता ठेवता आपण स्वतःला विसरून गेलो आहोत. तुम्ही कुणाचे मित्र आहात, शत्रू आहात, पिता आहात, पुत्र आहात, पती आहात, पत्नी आहात. या नात्यांनी तुम्ही इतके वेढले गेले आहात की, तुम्ही इतके निकट असूनही स्वतःला ओळखू शकला नाहीत. या नातेसंबंधांपेक्षा तुम्ही वेगळे आहात याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नात्यांची ही वस्त्रे दूर करून तुम्ही स्वतःला कधी बघितलं आहे का? ही नाती स्वतःमधून वजा करा. असे समजा की, तुम्ही आपल्या आई-वडिलांचे पुत्र नाहीत, तुमच्या पत्नीचे पती नाहीत, आपल्या मुलांचे पिता नाहीत, मित्रांचे मित्र नाहीत, शत्रूचे शत्रू नाहीत आणि मग जे काही शिल्लक उरतं तेच तुमचं वास्तव असणं आहे. ही शिल्लक राहिलेली अधिसत्ताच तुम्ही स्वतः आहात. त्यातच आपल्याला राहायचं आहे.
ही सूत्रं अमलात आणली तर असं वातावरण तयार होईल जे शांती आणि सत्यानुभूतीची साधना करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे."
Osho
ओशो को लंदन के दॅ संडे टाइम्स ने “बीसवीं सदी के 1000 निर्माताओं” में से एक कह कर वर्णित किया है। सुप्रसिद्ध अमरिकी लेखक टॉम राबिन्स ने लिखा है कि ओशो “जीसस क्राइस्ट के बाद सर्वाधिक खतरनाक व्यक्ति हैं।” भारत के संडे मिड-डे ने ओशो को गांधी, नेहरू और बुद्ध के साथ उन दस लोगों में चुना है जिन्होंने भारत का भाग्य बदल दिया। अपने कार्य के बारे में ओशो ने कहा है कि वे एक नये मनुष्य के जन्म के लिए परिस्थितियां तैयार कर रहे हैं। इस नये मनुष्य को वे ‘ज़ोरबा दि बुद्धा’ कहते हैं-जो ‘जोरबा दि ग्रीक’ की तरह पृथ्वी के समस्त सुखों को भोगने की क्षमता रखता हो और गौतम बुद्ध की तरह मौन स्थिरता में जीता हो। ओशो के हर आयाम में एक धारा की तरह बहता हुआ वह जीवन-दर्शन है जो पूरब की समयातीत प्रज्ञा और पश्चिम के विज्ञान और तकनीकी की सर्वोच्च संभावनाओं को एक साथ समाहित करता है। ओशो आंतरिक रूपांतरण के विज्ञान में अपने क्रांतिकारी योगदान के लिए जाने जाते हैं और ध्यान की उन विधियों के प्रस्तोता हैं जो आज के गतिशील जीवन को ध्यान में रख कर रची गई हैं।
Add to Cart Add to Cart Add to Cart Add to Cart Add to Cart Add to Cart Customer Reviews 4.9 out of 5 stars 12 4.1 out of 5 stars 7 5.0 out of 5 stars 5 5.0 out of 5 stars 2 4.3 out of 5 stars 65 4.2 out of 5 stars 14 Price ₹174.00₹174.00 ₹129.00₹129.00 ₹138.00₹138.00 ₹137.70₹137.70 ₹125.00₹125.00 ₹100.80₹100.80Publisher : Saket Prakashan Pvt Ltd; First Edition (1 January 2014); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar, 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 144 pages
ISBN-10 : 8177868675
ISBN-13 : 978-8177868678
Item Weight : 100 g
Dimensions : 14 x 14 x 21 cm
Net Quantity : 1 Count
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Chhatrapati Sambhajinagar, 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book